नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गार

नांदेड :रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता.१) गडगा (ता.नायगाव) येथील दूध संकलन केंद्र बंद करून एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता.१) गडगा (ता.नायगाव) येथील दूध संकलन केंद्र बंद करून एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

दुधाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. लॉकडाउनमुळे दुधाला मागणी नाही. त्यामुळे अतिरिक्त दुधाची पावडर तयार करून निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे. दुधाला किमान आधारभूत किंमत सरकारने जाहीर करावी, आदी मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलनात शिवा पाटील, शिवाजी गायकवाड, साहेबराव चट्टे, केशव पवार, उमाकांत ताकबीडकर,भुजंग भाकरे,जयराज शिंदे, सुरेश महाराज, जगदीश जाधव,व्यंकट शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते .नांदेड जिल्ह्यातील सोमठाणा,मुगाव,मांजरम येथे दूध संकलन केंद्र बंद करून आंदोलन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com