Farmers Agricultural News Marathi agitation for milk rate issue Nanded Maharashtra | Agrowon

नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गार

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता.१) गडगा (ता.नायगाव) येथील दूध संकलन केंद्र बंद करून एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

नांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता.१) गडगा (ता.नायगाव) येथील दूध संकलन केंद्र बंद करून एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

दुधाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. लॉकडाउनमुळे दुधाला मागणी नाही. त्यामुळे अतिरिक्त दुधाची पावडर तयार करून निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे. दुधाला किमान आधारभूत किंमत सरकारने जाहीर करावी, आदी मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलनात शिवा पाटील, शिवाजी गायकवाड, साहेबराव चट्टे, केशव पवार, उमाकांत ताकबीडकर,भुजंग भाकरे,जयराज शिंदे, सुरेश महाराज, जगदीश जाधव,व्यंकट शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते .नांदेड जिल्ह्यातील सोमठाणा,मुगाव,मांजरम येथे दूध संकलन केंद्र बंद करून आंदोलन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...