Farmers Agricultural News Marathi agitation for milk rate issue Pune Maharashtra | Agrowon

महायुतीचे आज दूध बंद आंदोलन 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पुणे : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल चालवले आहेत. त्यामुळे दूध दराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज (ता.१) महायुतीने महाएल्गार दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे, असे माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हाल चालवले आहेत. त्यामुळे दूध दराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज (ता.१) महायुतीने महाएल्गार दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे, असे माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे, रिपाई आठवले गटाचे अविनाश महातेकर, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. 
शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये निर्यात अनुदान मिळावे, अशा दोन मुख्य मागण्या महायुतीने केल्या आहेत. 

श्री. खोत म्हणाले की, दूध दरासाठी रयत क्रांती संघटनेने १५ मे रोजी पहिले आंदोलन केले होते. सात जुलैला दुसरे आणि २० जुलैला तिसऱ्यांदा आंदोलन केले. मात्र, सरकार जागे होत नसल्याने आज राज्यव्यापी आंदोलन होईल. यात राज्यभर दुधाच्या गाड्या अडवून गरिबांना मोफत दूध वाटले जाईल. दूध रस्त्यावर ओतले जाणार नाही. 

‘‘महाआघाडी सरकारला कोरोनाने झपाटले आहे. कोरोनाचा बाहुला नाचवून शेतकऱ्यांना मदत नाकारली जात आहे. ग्रामीण भागात तयार झालेली जगण्याची कोंडी सोडविण्यास सरकार तयार नाही. राज्यात सव्वा कोटी लिटर दुधापैकी ६० लाख लिटर दूध पिशवीतून विकले जाते. त्याचा दर ग्राहकांसाठी ४० ते ५० रुपये आहे. मग शेतकऱ्यांना वीस रुपये भाव का दिला जात आहे,’’ असा सवाल श्री. खोत यांनी विचारला. 

राज्याच्या २८८ तालुक्यात दूध विकले जाते. सरकारने मात्र दूध खरेदी योजना केवळ दहा दूध संघांसाठी सुरू केली. त्यात पुन्हा हे दूध संघ मुठभर मंत्र्यांचे आहेत. राज्यभर इतर दूध संघ अडचणीत आहेत, असा आरोप श्री. खोत यांनी केला. 

...तर मी राजकारणातून निवृत्त होण्यास तयार 
फडणवीस सरकारच्या विरोधात आधी दुधासाठी आंदोलन करणारे कॉंग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आता स्वतःच्या सरकारमध्ये गप्प बसले आहेत. विदेशातून एक ग्रॅम देखील दूध भुकटी आयात केलेली नाही. मात्र, आयात झाल्याची चुकीची माहिती थोरात देतात. त्यांनी आयातीची कागदपत्र दाखविल्यास राजकारणातून मी निवृत्त होईल; पण सिद्ध न केल्यास थोरात यांनी राजकारण सोडावे, असे आव्हान श्री. खोत यांनी दिले.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...