Farmers Agricultural News Marathi agitation for pending sugarcane bill nanded maharashtra | Agrowon

थकीत एफआरपीसाठी साखर सहसंचालक कार्यालयाच्या काचा फोडल्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नांदेड : एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. थकीत एफआरपीवर व्याज आकारणी सुरू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १५) नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात दिवसभर ठिय्या मांडला. सातत्याने मागणी करूनही त्याकडे संबंधित अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्या फेकल्या.

नांदेड : एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. थकीत एफआरपीवर व्याज आकारणी सुरू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १५) नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात दिवसभर ठिय्या मांडला. सातत्याने मागणी करूनही त्याकडे संबंधित अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्या फेकल्या.

नांदेड विभागातील कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात एकरकमी एफआरपी न दिलेल्या थकीत रकमेवर व्याज आकारणी सुरू करावी. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याकडे चार वर्षांपासून थकीत असलेली नांदेड, परभणी, हिंगोली तसेच अन्य काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची ४ कोटी २२ लाख रुपयांची येणेबाकी शेतकऱ्यांना मिळेपर्यंत ट्वेंटी शुगर कारखान्याला दिलेला गाळप परवाना रद्द करावा.

साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी खुर्चीला मारले जोडे... पहा Video

महाराष्ट्र शुगर कारखान्याबाबतच्या निर्णयाविरोधात साखर आयुक्त कार्यालयाने याचिका दाखल करावी. २०१४-१५ मधील ऊसबिलावरील विलंब व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कार्यवाही करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दरनियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.१५)  साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी कोंडून घेत ठिय्या आंदोलन केले.

ऊस शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात साखर आयुक्त कार्यालयाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. वेळप्रसंगी साखर सहसंचालक कार्यालयातच मुक्काम करू, असे श्री. इंगोले यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...