Farmers Agricultural News Marathi agitation for pending sugarcane bill nanded maharashtra | Agrowon

थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 जानेवारी 2020

नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याकडील २०१५ मध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल व्याजासह शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २८) शेतकरी संघर्ष समितीतर्फे नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याकडील २०१५ मध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल व्याजासह शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २८) शेतकरी संघर्ष समितीतर्फे नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स साखर कारखान्याला २०१५ मध्ये  अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाचे सुमारे चार कोटी रुपयांवरील ऊसबिल अद्याप थकीत आहे. ऊस बिलाप्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. कारखान्यावर आरआरसीची कारवाई करूनही विक्री झाली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचे ऊस बिल थकीत आहे. शेतकऱ्यांना थकीत ऊसबिल व्याजासह तत्काळ अदा करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे कॅाम्रेड विलास बाबर, एकनाथ पौळ, ज्ञानदेव शिंदे, भीमराव शिंदे, गंगाधर रोकडे आदींनी साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालत मागण्यांचे निवेदन दिले.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...