Farmers Agricultural News Marathi agitation for soybean seeds issue Parbhani Maharashtra | Agrowon

सोयाबीन बियाणेप्रश्नी परभणीत आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

परभणी  ः महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता.२९) महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला.

परभणी  ः महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता.२९) महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरणी केलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत. या परिस्थितीत महाबीजने शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून द्यावे या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिंगबर पवार, भास्कर खटिंग, केशव आरमळ, मुंजाभाऊ लोडे, दत्ता गरुड आदी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली;

परंतु, महाबीज प्रशासनाने बियाणे बदलून देण्यास चालढकल केली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी विभागीय व्यवस्थापक ए. एस. सोनुने यांना घेराव घालून बियाणे बदलून देण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले, असे श्री.ढगे यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...