देऊळगावराजा बाजार समितीच्या सभापतींना ‘स्वाभिमानी’चा घेराव

मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारसमिती सभापतींना घेराव घातला
मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारसमिती सभापतींना घेराव घातला

बुलडाणा  : देऊळगावमही येथे सुरू असलेल्या शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रावर व्यापारी आणि राजकीय व्यक्तींशी आर्थिक संगनमत करून त्यांच्या कापूस वाहनांना रांगेत उभे न करता ताबडतोब टोकन देऊन खरेदीचा प्रकार करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’च्या वतीने बाजार समितीचे सभापती महेश देशमुख यांना घेराव घालण्यात आला.

याबाबत माहिती अशी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कापसाची हमीभावाप्रमाणे विक्री करता यावी यासाठी शासनाने पणन महासंघाच्या माध्यमातून देऊळगावमही येथील सागर अँग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कापूस वाहनासह तीन-चार दिवस मुक्काम करावा लागत असून सदर वाहनांचे जास्तीचे भाडे भरावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लावत आहे. देऊळगावमही येथील या खरेदी केंद्रावर बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी व कापुस खरेदी केंद्र चालक व्यापारी आणि राजकीय व्यक्तींशी आर्थिक संगनमत करुन त्यांची वाहने रांगेत न लावता ताबडतोब टोकन देऊन कापूस खरेदी करण्याचा प्रकार नियमित करीत आहेत. असाच प्रकार २५ फेब्रुवारीला घडला असून ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी तो समोर आणला होता. बाजार समितीने सदर वाहनाचा पंचनामा केला असून त्यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सात वाहनांना रांगेत न लावता थेट टोकन दिल्याची बाब समोर आली आहे.

सदर गैरप्रकारात दोषींवर बाजार समितीच्या माध्यमातून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतिश विष्णु मोरे, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, राजेंद्र शिंगणे, रामनारायण मोरे, रामकिसन शिंदे, राजेंद्र बोरकर, गणेश सिरसाट, शिवाजी सिरसाट, गजानन काबुकडे, हरी चव्हाण यांनी सभापती महेश देशमुख यांना घेराव घातला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com