Farmers Agricultural News Marathi agriculture inputs will available in government rates Pune Maharashtra | Agrowon

वेल्ह्यात शासकीय दरात उपलब्ध होणार कृषी निविष्ठा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या टाळेबंदी सुरु आहे. या स्थितीतही शेतकऱ्यांना शासकीय दरात खते व बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र वेल्हा तालुक्यात खते व बियाण्यांचा पुरवठा करणारा एकही घाऊक विक्रेता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना नसरापूर येथे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून वेल्हा येथील पंचायत समितीच्या गोदामामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दरात कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या टाळेबंदी सुरु आहे. या स्थितीतही शेतकऱ्यांना शासकीय दरात खते व बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र वेल्हा तालुक्यात खते व बियाण्यांचा पुरवठा करणारा एकही घाऊक विक्रेता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना नसरापूर येथे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून वेल्हा येथील पंचायत समितीच्या गोदामामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दरात कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

वेल्हे तालुक्यात घाऊक विक्रेता नसल्याने शेतकऱ्यांना भात बियाणे व खतांसह इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी नसरापूर येथे जावे लागत होते. जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला असून, नसरापूर येथेही प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात भात बियाणे व खतांचा तुटवडा भासण्याची भिती तालुकास्तरीय खरीप हंगाम बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यात कृषी सेवा केंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन श्री. शिवतरे यांनी दिले होते. त्यानंतर पंचायत समितीच्या गोदामात जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

केंद्राचे उद्घाटन रविवारी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती सदस्य अनता दारवटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, वेल्हे तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. वेल्हे तालुक्यातील १४५ शेतकरी गटांना इंद्रायणी भाताचे बियाणे, युरिया, डीएपी आदींचा पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकरी गटाचे प्रमुख, कृषी मित्र व कृषी सहायकांनी गावातील शेतकऱ्यांची चर्चा करून खरीप हंगामात त्यांना लागणाऱ्या बियाणे व खतांची मागणी नोंदवावी, त्यानंतर वेल्हा येथील केंद्रात शेतकऱ्यांना पुरवठा केला जाईल, असे श्री. शिवतरे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...