संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आजपासून कृषी संजीवनी सप्ताह

पुणे : पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रींचा प्रसार करण्यासाठी राज्यभर आजपासून (ता. १) कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ होत आहे. या कालावधीत कृषिमंत्र्यांसह कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.

पुणे  : पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रींचा प्रसार करण्यासाठी राज्यभर आजपासून (ता. १) कृषी संजीवनी सप्ताहास प्रारंभ होत आहे. या कालावधीत कृषिमंत्र्यांसह कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.

राज्यात कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याची संकल्पना कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यात मांडली होती. श्री. भुसे स्वतः नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, कृषी सचिव एकनाथ डवले आज पालघर भागात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद भागात थेट बांधावर जावून श्री. डवले शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतील.

कृषी विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच त्यांच्या अपेक्षा समाजावून घ्याव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहेत. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या नियोजनाखाली राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी होईल. तसेच पुरस्कारप्राप्त, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहेत. तालुकास्तरीय कार्यक्रमात प्रयोगशील शेतकऱ्यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला.  

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक सप्ताहाच्यानिमित्ताने दररोज एका गावात जाणार आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना मात्र किमान दोन गावांना जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com