Farmers Agricultural News Marathi Ajit pawar says agriculture ITI will start at pune maharashtra | Agrowon

पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना देण्याबरोबरच तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात कृषी आयटीआयसारखी नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. राज्यातील तरुणांचा कौशल्य विकास साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. त्यापैकी एक महत्त्वाची संस्था पुणे जिल्ह्यात सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना देण्याबरोबरच तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात कृषी आयटीआयसारखी नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. राज्यातील तरुणांचा कौशल्य विकास साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. त्यापैकी एक महत्त्वाची संस्था पुणे जिल्ह्यात सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २६) शिवाजीनगर पोलिस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण झाले. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी या वेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध पथकांची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. राष्ट्रपती पोलिस पदकप्राप्त व विशेष सुरक्षा पदकप्राप्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे गरजेचे आहे. आजपासून प्लॅस्टिक पिशवीमुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान सुरू करण्यात येत आहे. पुण्यात मेट्रोची कामे गतीने होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत निश्चितच सुधारणा होईल. 
 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...