Farmers Agricultural News Marathi Ajit Pawar says to take a efforts to provide immediate relief to cyclone victims Pune Maharashtra | Agrowon

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे प्रयत्न ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देता यावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे लवकर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. 

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देता यावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे लवकर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. 

निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा शुक्रवारी (ता.५) पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यानंतर शनिवारी (ता.६) श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, सुनील शेळके, अतुल बेनके, संग्राम थोपटे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ३७१ गावांतील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचे ७ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी तालुकानिहाय नुकसानीची माहिती मंत्री पवार यांना दिली. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करणे, वीजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाड्यांची दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करणे, नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून अहवाल सादर करणे आदी सूचना त्यांनी केल्या.  

यावेळी वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील बाळहिरड्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. आदिवासी भागातील हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. बाळहिरड्याला प्रति किलो २४० रुपये इतका भाव आहे. या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेगळा मापदंड लावून नुकसान भरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले, त्यासाठी तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...