पुणे जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर अमेरिकन लष्करी अळी 

पुणे जिल्ह्यात सुमारे ५५३७ हेक्टरवर मक्याचीलागवड झाली आहे. त्यापैकी एक ते दीड हजार हेक्टरवर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव दिसून आला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या काही दिवसांपासून मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे ५५३७ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. त्यापैकी एक ते दीड हजार हेक्टरवर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव दिसून आला आहे. इंदापूर, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौंड भागातही या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती असून कृषी विभागाने याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यंदा लवकर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मक्याची लवकर लागवड करण्यास सुरुवात केली. इंदापुरातील शेळगाव, निमगाव, वळकुटे, अंथुर्णे,  वालचंदनगर, कळस, भिगवण, बावडा, भातनिमगाव, लाखेवाडी, डहाळज, रूई न्हावी या गावांतील अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लवकर लागवड केली होती. त्यामुळे या भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

दौंड, बारामती, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगावमध्ये उशिराने मक्याची लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव हळूहळू दिसून येत आहे. मात्र, पुढील काळात या भागात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना सुरू करण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.    इंदापूर, दौंड, बारामती भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कृषी सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. दौंड, बारामती भागात उशिराने मक्याची लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात अळीचा प्रादुर्भाव अजून दिसून आलेला नाही, असे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी सांगितले. मक्याची दोन एकरांवर लागवड केली आहे. त्यावर दोन महिन्यांपासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत तीन वेळा फवारणी केली आहे. तरीही लष्करी अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com