Farmers Agricultural News Marathi Bachu Kadu write a letter about orange crop insurance issue amaravati maharashtra | Agrowon

विमा भरपाईपासून संत्रा उत्पादक वंचित राहता कामा नयेत : राज्यमंत्री बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अमरावती  ः महावेधच्या पर्जन्यमापकात पावसाची नोंद न झाल्याने चांदूर बाजार तालुक्‍यातील संत्रा पीकविमाधारक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले होते. या प्रकरणी आता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील प्रशासनाला पत्र लिहीत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी याकरिता सकारात्मक भूमिका घ्यावी. भरपाईपासून शेतकरी वंचित राहता कामा नयेत, असे बजावले आहे. 

अमरावती  ः महावेधच्या पर्जन्यमापकात पावसाची नोंद न झाल्याने चांदूर बाजार तालुक्‍यातील संत्रा पीकविमाधारक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले होते. या प्रकरणी आता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील प्रशासनाला पत्र लिहीत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी याकरिता सकारात्मक भूमिका घ्यावी. भरपाईपासून शेतकरी वंचित राहता कामा नयेत, असे बजावले आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरजगाव कसबा येथील १३५० शेतकऱ्यांनी आंबिया बहारातील संत्र्याचा विमा उतरविला होता. त्यापोटी विमा हप्ता म्हणून ६३ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. ३० डिसेंबर व ३१ डिसेंबर २०१९ ला शिरजगाव कसबा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाची महसूल दप्तरी नोंद आहे. त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी झाली म्हणून या भागात पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेशही दिले.

महावेधच्या पर्जन्यमापक यंत्रात मात्र या दोन दिवसांच्या पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली. विमा भरपाई मिळू नये याकरिता पर्जन्यमापक यंत्रणाच विमा कंपनीकडून बंद करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना भरपाईपोटी १९ हजार २५० रुपयांप्रमाणे २ कोटी ९५ लाख रुपये कंपनीकडून मिळणे अपेक्षित होते. या संदर्भात ‘ॲग्रोवन’मध्ये ३ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या शेतकऱ्यांशी तत्काळ संपर्क साधत चर्चा केली. 

शेतकऱ्यांना भरपाईची अपेक्षा

याप्रश्‍नी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील प्रशासनाला पत्र लिहीत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. संत्रा पीक विमा मिळण्यापासून परिसरातील शेतकरी वंचित राहता कामा नयेत, असे या पत्रात त्यांनी नमूद केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंत्री कडू यांच्या या भूमिकेमुळे लवकरच याप्रकरणी तोडगा निघून भरपाई मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...