Farmers Agricultural News Marathi Banks will cut mutual insurance premiums if farmers do not issue a declaration Pune Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका परस्पर विमा हप्ता कापणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी यंदा अर्ज भरण्याच्या मुदतीला ३१ जुलैनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी यंदा अर्ज भरण्याच्या मुदतीला ३१ जुलैनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

शेतकऱ्याने घोषणापत्र न दिल्यास त्याचा सहभाग बंधनकारक असल्याचा निष्कर्ष बॅंका काढू शकतील. तशी परवानगी शासनानेच बॅंकांना दिली. त्यामुळे योजनेत सहभाग घेण्याची इच्छा नसली, तरी केवळ घोषणापत्र दिले नाही म्हणून अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता परस्पर त्यांच्या कर्ज रकमेतून कापून घेण्याचा अधिकार बॅंकांना मिळाला आहे. घोषणापत्र न देणाऱ्या शेतकऱ्याने हप्ता कपात झाल्याची तक्रार केल्यास विचारात घेतली जाणार नाही.

विमा योजनेत सहभागासाठी आता केवळ २८ दिवसांचा अवधी उरला आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना आधी सक्तीची असल्याने कोट्यवधी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांच्या घश्यात जात होता. आता ही योजना ऐच्छिक झाली, असली तरी शेतकऱ्यांसाठी घोषणापत्राची अट  टाकण्यात आली आहे. त्यामुळे घोषणापत्र न देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजना एकप्रकारे सक्तीचीच आहे.
 
मूळ बॅंकेतच द्यावा लागेल प्रस्ताव
‘‘कर्जदार शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र त्यांचे खाते असलेल्या मूळ बॅंक शाखेत द्यावे लागेल. त्यानंतर घोषणापत्र तपासून सहभाग वगळला जाणार आहे. बॅंका या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता वजा करून घेऊ शकतात,’’ अशी माहिती एका जिल्हा बॅंकेच्या व्यवस्थापकाने दिली.


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...