Farmers Agricultural News Marathi Bjp will do agitation for several issues Mumbai Maharashtra | Agrowon

भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५) राज्यव्यापी धरणे  आंदोलन करणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

राज्यभरात तब्बल ४०० ठिकाणी भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांकडे आणि सामान्य जनतेकडे दुर्लक्ष करतेय. ठाकरे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनपीआरला विरोध करतेय, असा आरोप भाजपकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर भाजप धरणे आंदोलन करणार आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५) राज्यव्यापी धरणे  आंदोलन करणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

राज्यभरात तब्बल ४०० ठिकाणी भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांकडे आणि सामान्य जनतेकडे दुर्लक्ष करतेय. ठाकरे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनपीआरला विरोध करतेय, असा आरोप भाजपकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर भाजप धरणे आंदोलन करणार आहे.

भाजप संपूर्ण राज्यभरात ४०० ठिकाणी आंदोलन करणार आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल जनतेला सांगणार आहोत. तसेच ठाकरे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली आहे. हे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनपीआरला विरोध करत आहे म्हणूनच आम्ही संपूर्ण राज्यभरात धरणे आंदोलन करणार आहोत. आम्ही  आमची विचारधारा सोडलेली नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्यातील मतभेदांमुळेच पडणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार अवास्तविक आहे. तसेच, यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वत:च्या भरवशावर लढवेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  भाजपचे सरकार स्वप्नातच  आहे आणि स्वप्नातच राहणार, उन्हाळा वाढला आहे म्हणून धरणे आंदोलनाला जाताना भाजप नेत्यांनी सोबत छत्री घेऊन यावे, असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला.


इतर बातम्या
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...