पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन विभागासाठी १४ कोटी ४६ लाखांची तरतूद

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या ३०३ कोटी ६० लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही मंजूरी दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात ७ कोटी ९० लाखांची तूट झाली आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी १४ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद असून, बैलजोडी खरेदीसाठी अनुदान, जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या ३०३ कोटी ६० लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही मंजूरी दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात ७ कोटी ९० लाखांची तूट झाली आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी १४ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद असून, बैलजोडी खरेदीसाठी अनुदान, जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत.

‘कोरोना’च्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी आदेशामुळे जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय रद्द करावी लागली. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार मार्च महिन्यापुर्वी अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक मंजूर करावे, आणि यानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सभागृहात अहवाल सादर करावा, अशा सुचना राज्याच्या अर्थ विभागाने दिल्या आहेत. गतवर्षी ३११ कोटी ५० लाखांचे मूळ अंदाज पत्रक होते. २०१९-२०च्या ४७५ कोटीं रुपयांच्या सुधारीत अंतिम अंदाजपत्रकालाही प्रसाद यांनी मंजूरी दिली आहे.

यंदाच्या मुळ अंदाजपत्रकात बांधकाम विभागासाठी ४२ कोटी ८३ लाख रुपये, समाजकल्याण विभागासाठी ३५ कोटी ८२ लाख रुपये, शिक्षण विभागासाठी २१ कोटी ३२ लाख रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी १३ कोटी ३५ लाख रूपये, कृषी विभागासाठी ९ कोटी ५६ लाख रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी ४ कोटी ९० लाख रुपये, आरोग्य विभागासाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत महिला बालकल्याण, समाजकल्याण आणि आरोग्य व बांधकाम विभागासाठी कमी तर कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

मुद्रांक शुल्क निधी कमी झाल्याने तूट जिल्ह्यातील ११ गावे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने मुद्रांक शुल्क निधी कमी होणार आहे. गतवर्षी मुद्रांक शुल्काचा २६९ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, यंदा २४५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुद्रांक शुल्क मिळाले तर ग्रामपंचायतींच्या हिश्श्‍यातील मुद्रांकापैकी ०.२५ टक्के निधी हा ‘पीएमआरडीए’कडे वर्ग होणार आहे. ठेवींवर मिळणारे व्याज कमी होत आहे, या सर्व बाबींमुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात ७ कोटी ९० लाखांची तूट झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली.

नाविन्यपूर्ण योजना

  • जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई
  • ५० टक्के अनुदानावर बैलजोडी खरेदी
  • ५० टक्के अनुदानावर व्यवसायाभिमुख साहित्य पुरवठा
  •  शाळेतील विद्यार्थांना गणवेश पुरवणे
  • पाचवीतील विद्यार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर सायकली वाटप
  • मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा
  • सौर दुहेरी पंप योजना देखभाल दुरुस्ती करणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com