‘ॲग्रोवन'मधील ‘चकाट्या‘ही ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस'मध्ये

‘ॲग्रोवन'मधून ‘चकाट्या‘ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि व्यथा मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने घेतली आहे.
‘ॲग्रोवन'मधील ‘चकाट्या‘ही ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस'मध्ये
‘ॲग्रोवन'मधील ‘चकाट्या‘ही ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस'मध्ये

पुणे ः ‘ॲग्रोवन'मधून ‘चकाट्या‘ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि व्यथा मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने घेतली आहे. श्री. काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, जगण्यावर रेखाटलेली सर्वाधिक ४ हजार ३४१ पॉकेट कार्टून २००७ ते २०१९ या कालावधीत ‘ॲग्रोवन'मधून सलग प्रसिद्ध झाली आहेत. या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने घेतली असून तसे प्रमाणपत्र श्री. काळे यांना प्राप्त झाले आहे. याआधी भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने ‘ॲग्रोवन'चा गौरव केला आहे.

पुणे येथील केन्द्रीय विद्यालयात कला शिक्षक म्हणून श्री. काळे कार्यरत असून त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर रेखाटलेली ‘चकाट्या‘ ही पॉकेट कार्टूनस ‘ॲग्रोवन'मधून नियमित प्रसिद्ध होत आहेत. प्रबोधन आणि जनजागृती यावरच त्यांच्या व्यंगचित्रांचा भर आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबरोबरच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर त्यांच्या कुंचल्यातून फटकारे ओढले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडल्यांचा दिलासा मिळतो आहे.

या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री. काळे यांचे कौतुक केले आहे. ‘ॲग्रोवन'मध्ये नियमित प्रसिद्ध होणाऱ्या व्यंगचित्रांमुळे श्री. काळे यांना याआधी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स', ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया' आदींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com