मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार : उध्दव ठाकरे

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांना योजनेविषयी समाधान वाटले. रुग्णालयात दाखल असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेला या योजनेमुळे कर्जमुक्तीचा लाभ मिळाला हे ऐकून आनंद वाटला. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील आहेत. नागरिकांना मंत्रालयात लहानसहान गोष्टींसाठी हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय विभागीय स्तरावर सुरू केले. आता त्याचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना गुरुवारी (ता. २७) मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की विकासकामांच्या बाबतीत गती पकडली आहे. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. यावर्षी महाराष्ट्राला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशालाच नव्हे तर जगाला हेवा वाटावा असा हीरकमहोत्सव साजरा करूया, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

शिवभोजन योजनेमुळे गरजूंसाठी सोय झाली आहे. सरकार यशाच्या दिशेने ठामपणे पावले टाकत आहे. आदिवासी बांधवांच्या आणि दुर्बल घटकांच्या रक्षणासाठी शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. मराठी रंगभूमी ही देशाला मोठी देणगी असून या रंगभूमीने समाजातील व्यथांवर भाष्य केले. या रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन मुंबईत उभे करण्यात येईल. राज्यात महिला अत्याचाराबाबत जलदगतीने कायदा तयार केला जात आहे. विरोधकांनी उणिवा जरूर दाखवाव्यात मात्र राज्याच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बांधील आहेत हे लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com