Farmers Agricultural News Marathi corona patients increase Nagar Maharashtra | Agrowon

जामखेड हाॅटस्पाॅट; नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४४ वर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

नगर  ः जामखेडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जामखेड येथील आणखी तिघांची भर पडली. नगर जिल्ह्यात एकट्या जामखेडमध्येच आता कोरोनाबाधितांची संख्या सतरा तर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४४ वर गेली आहे.

नगर  ः जामखेडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जामखेड येथील आणखी तिघांची भर पडली. नगर जिल्ह्यात एकट्या जामखेडमध्येच आता कोरोनाबाधितांची संख्या सतरा तर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४४ वर गेली आहे.
 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या जामखेडमध्ये ‘कोरोना’चा कहर वाढतच आहे. तेथे ३ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याने, अत्यावश्‍यक सेवाही बंद आहेत. प्रशासनही हॉटस्पॉट परिसरात सावध भूमिका घेत, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेत आहे. जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या अहवालात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४४ वर गेली असून, त्यांपैकी २४ जणांना डिस्चार्ज दिला आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंधात्मक आदेश व खबरदारीच्या उपाययोजनांचे नागरिकांनी स्वयंशिस्तीने पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले.
 
अशी झाली लागण
काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली. त्यांच्या संपर्कातील दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर त्यापैकी एकाच्या वडिलांना, नंतर त्याच्या दोन मित्रांना लागण झाली. पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...