भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा रकमेचे वितरण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९ मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप आज (ता.१२) लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विमा कंपनीला दिले. 

विधानभवनात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रक्कम वितरणाबाबत श्री. पटोले यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे संचालक नारायण शिसोदे, भंडारा जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, विमा कंपन्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यातील एक लाख ६१ हजार ३४३ धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ५ कोटी ४३ लाख रुपये विमा हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ६७ कोटी ८६ लाख रुपये मिळणार आहेत. प्रति हेक्टरी ही रक्कम ९ हजार ६२ रुपये असेल, अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या वेळी दिली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करून जाहीर मेळावा घेण्यात यावा, त्यात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत वाटप करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये विमा वितरणासंदर्भात साशंकता राहणार नाही, असे अध्यक्ष श्री. पटोले यांनी या वेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com