Farmers Agricultural News Marathi crop insurance scheme status Ratnagiri Maharashtra | Agrowon

रत्नागिरीतील ७४८ शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रत्नागिरी  : खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३१) शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ७४८ शेतकऱ्यांनी या योजनेतून पीकविमा उतरवला.

रत्नागिरी  : खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३१) शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ७४८ शेतकऱ्यांनी या योजनेतून पीकविमा उतरवला.गतवर्षीच्या तुलनेत या योजनेला यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवण्याकडे पाठ फिरवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा शासनाने विमा योजनेच्या निकषांत बदल करून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेतला. कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचा अथवा न होण्याचा पर्याय आहे. सहभागी न होण्याबाबत शेतकऱ्यांना अंतिम मुदतीच्या अगोदर सात दिवस घोषणापत्र द्यावे लागणार होते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पीक विम्याकरिता इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीची नेमणूक केली आहे.

यंदा कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गतवर्षी ऐन हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना विमा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे १०४८ शेतकऱ्यांना २० लाख रुपये भरपाई मिळाली होती. हे लक्षात घेऊन यंदा पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ७४८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. यामध्ये ६० टक्के शेतकरी हे बिगर कर्जदार आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...