Farmers Agricultural News Marathi crops badly affected due unfavorable climate Satara Maharashtra | Agrowon

खटाव तालुक्यात प्रतिकूल हवामानाचा पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

बुध, जि. सातारा  ः गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पहाटे पडणा-या दव आणि दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व बटाटा पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फवारण्या करून पीक वाचविण्यासाठी सध्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. चार दिवस कोरडे तर चार दिवसानंतर तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामही वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

बुध, जि. सातारा  ः गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व पहाटे पडणा-या दव आणि दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व बटाटा पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फवारण्या करून पीक वाचविण्यासाठी सध्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. चार दिवस कोरडे तर चार दिवसानंतर तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामही वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

सततचे ढगाळ वातावरण आणि थंडीच्या अभावामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा कांदा, बटाटा आदी पिकांवर मावा, तुडतुडे व करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी उत्तर खटाव परिसरातील शेतकरी फवारण्या करताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. खरिपाच्या भरवशावर अनेक स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा परतीच्या पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके कापणीच्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसाने थैमान घालून होत्याचे नव्हते केले. 

या संकटातून सावरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले. पेरणीनंतर पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पहाटेचे दव, धुके व ढगाळ वातावरणामुळे पिके अडचणीत आली आहे. असेच वातावरण काही दिवस टिकून राहिले तर खरिपाप्रमाणे रब्बी हंगामातील पिके देखील वाया जाण्याची चिंता शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.

सततच्या प्रतिकूल हवामानामुळे गहू पिकावर मावा, तांबेरा, हरभ-यावर घाटेअळी, ज्वारीवर चिकट्याचा तर कांदा बटाटा पिकावर करप्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात गहू, हरभरा, कांदा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली थंडी फेब्रुवारी महिन्यापर्यंत गायब असल्याने पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
 
अशी आहे स्थिती

  • प्रतिकूल हवामानामुळे गहू, हरभरा,  कांदा, ज्वारीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव
  • फवारण्या करून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
  • उत्पादन मोठी घट होण्याची शक्यता

इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...