Farmers Agricultural News Marathi crops damage due to rain Aurangabad Maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

अवकाळी पाऊस पिकांच्या मुळावर उठला आहे. ज्वारी व हरभऱ्याची मळणी करत असतानाच  अचानक वादळासह पाऊस आला आणि गोण्यांतील शेतीमाल भिजला
- धनंजय सोळंके, शेतकरी, नागापूर, जि. बीड.

औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान कायम असतानाच मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (ता ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात जोरदार वादळ व काही ठिकाणी तुरळक गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस होत आहे. या पावसासोबतच वादळ व काही ठिकाणी होत असलेल्या गारपिटीमुळे फळ पिकांसह उशीराने पेरणी होऊन आता काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी (ता ३०) रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

प्रशासनाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, कांचनवाडी, चिकलठाणा, करमाड, पिंपळवाडी, शिऊर, करंजखेडा, सोयगाव, सावलदबारा, आळंद या दहा मंडळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील राजूर, वाग्रुळ, विटेगाव, रामनगर, जामखेड, रोहिलागड, गोंदी, परतुर, वाटुर, आष्टी, सातोना, शेलगाव, बावणे पांगरी, घनसावंगी, तीर्थपुरी, रांजणी, जांबसमर्थ, मंठा, तळणी, ढोकसाळ आदी वीस मंडळात अवकाळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील शेलगाव मंडळात सर्वाधिक ११.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अधिक होता.

बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, आणि शिरूर कासार आदी तालुक्यांतील काही मंडळात वादळी वारे व काही ठिकाणी तुरळक गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड तालुक्यातील पाली, राजुरी, लिंबागणेश, पेडगाव, चौसाळा, नेकनुर, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, अमळनेर, गेवराई तालुक्यातील गेवराई व सिरसदेवी, माजलगाव तालुक्यातील गंगामसला व किट्टीवडगाव, परळी तालुक्यातील नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव, धारुर तालुक्यातील मोहोखेडा, वडवणी तालुक्यातील वडवणी व कवडगाव तसेच शिरूर कासार तालुक्यातील रायमोह आदी १९ मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यातील सिरसाळा मंडळात सर्वाधिक २७ तर पिंपळगाव मंडळात २५.२५, रायमोह १२.२५, गंगामसला १८.७५ तर राजुरी मंडळात ११.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली तर काही शेतकऱ्यांचा मळणी केलेला व सोंगून ठेवलेला शेतीमाल भिजला.
 
पिकांना मोठा फटका
सिरसाळ्यात सोमवारी (ता.३०) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. विजेचा कडकडाट, सोसाटयाच्या वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. यामुळे काढणीला आलेली ज्वारी, कडबा, गहू, हरभरा या पिकांना पुन्हा फटका बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोणी दखल घेत नाही. विमा कंपन्यांच्या वेबसाईट बंद आहेत. विमा उतरविलेला आहे पण वेबसाईट बंद असल्याने कंपन्यांना पीक नुकसान कळवावे कसे हा प्रश्नच आहे, असे विरमगाव येथील आंबा उत्पादक  गवनाजी अधाने यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...