‘अवकाळी’ने पुणे जिल्ह्यात पिकांचे नुकसान

पुणे ः पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बुधवारी (ता.२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकरी अधिकच संकटात आले आहेत .
अवकाळी पावसामुळे दौंड तालुक्यात गहू पिकाचे झालेले नुकसान

एकिकडे दिवसेंदिवस ऊन वाढत असताना बुधवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे गहू, हरभरा, मका, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतात असलेल्या पालेभाज्या व फळपिकांवरही परिणाम झाला आहे. सध्या गहू, हरभरा या पिकांच्या काढणीचा कालावधी आहे मात्र ‘कोरोना’मुळे ही काढणी लांबली आहे.

शेतातील ज्वारीचा कडबा पावसाने भिजल्याने त्याचे नुकसान झाले असून उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाने काढणीस आलेल्या कलिंगड, टरबूज या पिकांचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे झाले नुकसान

  • काढणीस आलेला गहू, हरभरा, ज्वारी.
  • भाजीपाला पिके.
  • द्राक्षे, डाळिंब, आंबा ही फळपिके.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com