Farmers Agricultural News Marathi crops damage due to Stormy rain Pune Maharashtra | Agrowon

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला वादळी पावसाचा तडाखा

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

पुणे  : पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १०) सायंकाळनंतर जोरदार वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा दिला. यापावसामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांसह, कांदा व भाजीपाला पिकांचे, भुईमूग, सूर्यफूल या तेलबिया पिकांचे नुकसान होणार असून, द्राक्ष बागांनांही फटका बसला आहे.    

पुणे  : पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १०) सायंकाळनंतर जोरदार वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा दिला. यापावसामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांसह, कांदा व भाजीपाला पिकांचे, भुईमूग, सूर्यफूल या तेलबिया पिकांचे नुकसान होणार असून, द्राक्ष बागांनांही फटका बसला आहे.    

कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरासह गारगोटी, चंदगड, राधानगरी भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला. या पावसाने भुदरगड तालुक्यातील सूर्यफूल, भुईमूग पिकांचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू पिकांची काढणी सुरु असून, दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने या कामात अडथळा आला. 

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी गारा व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली असून गारांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. कऱ्हाड शहरासह तालुक्यातील शिरवडे, नडशी, उत्तर कोपर्डे, कोपर्डे हवेली आदी परिसरात विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास दमदार पाऊस व गारपीटही झाली. पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. साताऱ्यातील काशीळ, कोपर्डे, कामेरी, देशमुखनगर, अंगापूर, वर्णे परिसरातही गारा व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे भाजीपाला, कलिंगड पिकाचे नुकसान झाले. 

सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी चार आणि नंतर रात्री साडेआठच्या सुमारास काही भागात अचानकपणे पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणी सुरु असलेल्या रब्बी पिकांना फटका बसला तर कांदा, द्राक्ष उत्पादकांची धांदल उडाली. करमाळा, उत्तर सोलापूर, सांगोला, माढा भागात प्रामुख्याने या पावसाने हजेरी लावली. सांगोल्यात काही भागात गारा पडल्या. सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सांगोला तालुक्यात पावसाने द्राक्षबागांना फटका बसला. बेदाण्यासाठी शेडवर टाकलेल्या द्राक्षाचेही नुकसान झाले. माढा आणि करमाळ्यातही वाऱ्यासह पाऊस आल्याने काढणी सुरु असलेल्या कांदा, मका, ज्वारीचे नुकसान झाले.  

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. नाळेगाव, रोहिणा (ता. चाकूर) येथे वादळी वारा, विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस पडला. तांदुळजा (ता. लातूर) येथे पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तब्बल पाऊण तास झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी आडवी पडून मोठे नुकसान झाले. तुरोरी, उमरगा, अर्नाळासह परिसरातही पावसाने हजेरी लावली.

अशी आहे स्थिती

  • कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यात गारपीट
  • गहू, ज्वारी काढणीची कामे खोळंबली
  • कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान
  • भुईमूग, सूर्यफुलासह द्राक्षबांगाना फटका

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...