Farmers Agricultural News Marathi dam storage status Aurangabad Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६ मोठ्या मध्यम व लघू प्रकल्‍पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६ मोठ्या मध्यम व लघू प्रकल्‍पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. 

२५ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील मोठ्या,मध्यम, लघु प्रकल्पांसह तेरणा, मांजरा, रेणा व गोदावरी नदीवरील बंधारे मिळून ८७६ प्रकल्पांत  ८४.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पात ९३.५८, ७५ मध्यम प्रकल्पात ८२.४५, लघु प्रकल्‍पांत ६२.४०, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ६०.८७ तर तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमध्ये ८९.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये औरंगाबाद, बीड, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक, नांदेडमधील तीन व परभणीतील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील १५, जालन्यातील ७, बीडमधील ११,उस्मानाबाद मधील ८, नांदेडमधील ९ व परभणीतील दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

७५ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा असलेल्या ४२६ लघु प्रकल्‍पांत औरंगाबादमधील ७४, जालन्यातील ३४,बीडमधील ७२,लातूरमधील ६४, उस्मानाबादमधील ७१, नांदेडमधील ६८, परभणीतील १८ व हिंगोलीतील २५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी दोन व बीड मधील पाच मिळून ११ लघु प्रकल्‍ंपात २५ सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध नव्हता. दुसरीकडे ३ मध्यम व ६२ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच होता. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या मध्यम प्रकल्पात, बीडमधील दोन, लातूर मधील एक तसेच ६२ लघु प्रकल्‍पात औरंगाबादमधील चार, जालनामधील पाच, बीडमधील १५, लातूरमधील १३, नांदेडमधील दोन व उस्मानाबाद मधील सर्वाधिक २३ लघु प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

४७मध्यम प्रकल्प तुडुंब
मराठवाड्यातील जवळपास ४७ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तुडुंब झालेल्‍या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील १४, जालन्यातील ६, बीडमधील १०, लातूरमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...