Farmers Agricultural News Marathi demand for to give a right to vote to farmers in market committee elections nashik maharashtra | Agrowon

बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाण्यासाठी ठराव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार पुन्हा मिळावा, यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसभेत ठराव मांडला. सरपंच व उपसरपंच यांनी अनुमोदन देत हा ठराव संमत केला. 

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार पुन्हा मिळावा, यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसभेत ठराव मांडला. सरपंच व उपसरपंच यांनी अनुमोदन देत हा ठराव संमत केला. 

नैताळे - रामपूर ग्रामपंचायतीच्या रविवारी (ता. २६) झालेल्या ग्रामसभेत बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी ठराव संमत करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा डावखर होत्या. उपसरपंच संजय बोरगुडे, सदस्य अरविंद बोरगुडे, माजी सरपंच दादा बोरगुडे, सोसायटी संचालक राजेंद्र घायाळ, रतन बोरगुडे, सुनिल बोरगुडे, तलाठी शांताराम गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी डी. एम. दुकळे आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. जे शेतकरी बाजार समितीत शेतीमाल विक्री करतील त्यांना संचालक निवडीसाठी बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याचा अधिकार मिळावा, अशी सूचना ग्रामसभेत सदस्य अरविंद बोरगुडे यांनी मांडली. त्यावर ग्रामसभेस उपस्थित नागरिकांनी सूचना व मनोगते मांडली. 

शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यांमध्ये विक्री करतात. परंतु, त्यांना संचालक निवड प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. महायुतीच्या शासनाने शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत थेट मतदानाचा अधिकार दिला होता. परंतु, आता बाजार समिती संचालक मंडळाच्या निवड प्रक्रियेत फक्त ग्रामपंचायत, विकास कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांच्या सदस्यांनाच मतदान करता येईल असा बदल करण्यात आला आहे. हा केलेला बदल रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांना या प्रक्रियेत थेट मतदानाचा अधिकार मिळावा अशी  सूचना या वेळी मांडण्यात आली.

या सूचनेला सरपंच सौ. मनिषा डावखर, उपसरपंच संजय बोरगुडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. संमत झालेल्या ठरावाची प्रत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकार व पणनमंत्री तसेच पालकमंत्र्यांना पाठविण्यात येईल, अशी माहिती उपसरपंच संजय बोरगुडे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...