'नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांचे कर्ज माफ करा'

'नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांचे कर्ज माफ करा'
'नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्यांचे कर्ज माफ करा'

नाशिक : राज्यातील ३० सप्टेंबर अखेर नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफ करावे, अशी मागणी नाशिक तालुक्यातील सिद्ध पिंपरी येथील शेतकऱ्यांनी ठराव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यातील आमदारांकडे केली आहे. 

राज्यातील शेतकरी हा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी संस्था व विकास कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून पीककर्ज घेत असतो. या घेतलेल्या पीककर्जाची परतफेडीची मुदत काही बँकांची ३१ मार्च तर विकास सेवा सोसायट्यांची ३० जून असते. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाचे नवे-जुने करण्यासाठी उसनवारी करून ही रक्कम भरत असतो. मात्र, त्यामागे कर्जाचा डोंगर कधीही कमी होत नसतो. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ अखेर सरकारने पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची एक हेक्टरपर्यंत कर्ज माफ करावे. प्रामाणिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आमची सरकारकडे विनंती असल्याचे ठरावाचे पत्र सिद्ध पिंपरी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील नवनिर्वाचित मंत्री व सर्व विधानसभा सदस्यांना पाठवले आहे.

या आशयाचे पहिले निवेदन देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांना देण्यात आले. या वेळी मनोज जाधव, शशिकांत ढिकले, सुनील कदम, आनंदा ढिकले, भास्कर ढिकले, उत्तम राजोळे, सुरेश साळुंके, मधुकर ढिकले, बाळू साळुंके, नवनाथ साळुंके, देविदास भोर, दत्तू ढिकले आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com