नागरिकांनी धार्मिक कार्ये घरातच करावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला ‘कोरोना’पासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनीही ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नये. पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांनी सण, उत्सव, पूजा-अर्चा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार

याबाबत श्री. पवार म्हणाले, की ‘कोरोना’ची साखळी तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचे आज एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे, ‘कोरोना’ला प्रसाराची संधी न देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा-अर्चा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये.

‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले जाईल. ‘कोरोना’च्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. ‘कोरोना’प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही श्री. पवार यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com