मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज, करप्याचा प्रादुर्भाव
महापूर आणि अतिवृष्टीमुळे हळदीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतात पाणी साचल्याने कंदकुजही झाली आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होईल.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज.
सांगली ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात एक हजार २०० हेक्टरवर हळदीचे क्षेत्र आहे. अक्षयतृतीयेनंतर जिल्ह्यात हळद लावडीस प्रारंभ होतो. सर्वाधिक क्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. त्याखालोखाल मिरज तालुक्यात हळद पिक घेतले जाते. गेल्या तीन वर्षांपासून कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत हळदीचे लागवड क्षेत्र स्थिर आहे. पोषक वातावरण असल्याने हळदीच्या उत्पादनात वाढ झालेली आहे.
यंदा ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे हळदीच्या शेतात पाणी साचून राहिले. त्याचा परिमाण पिकावर झाला. कंदकूज आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारण्यादेखील केल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
यंदा दरात वाढ होणार का?
गेल्या तीन वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर नाही. यंदा देशात २५ लाख पोती हळद शिल्लक आहे. त्यातही दर नसल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी
पुढे आले नाहीत. यंदा उत्पादन कमी होणार असल्याने दरात वाढ होणार का याची प्रतिक्षा हळद उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
- 1 of 1022
- ››