Farmers Agricultural News Marathi district bank will give fund for meal scheme Pune Maharashtra | Agrowon

शरद भोजन योजनेसाठी पुणे जिल्हा बॅंकेचा एक कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

पुणे   : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी देशभर जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतमजूर, कष्टकरी, रोजंदारी कामगार, निराधार घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शरद भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.

पुणे   : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी देशभर जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतमजूर, कष्टकरी, रोजंदारी कामगार, निराधार घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शरद भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.

‘कोरोना’च्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्राबरोबर छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत शेतकरी, शेतमजूर, कामगारांसह अनेक घटकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. टाळेबंदीच्या काळात निराधार दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता यांच्यासाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी शरद भोजन योजना सुरू करण्यात आली. अंगणवाडी मदतनीसांच्या माध्यमातून गावोगावी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

पुढे या योजनेची व्याप्ती वाढवून स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. तृतीयपंथीय, कलाकार आणि कोणतही कागदपत्र नसलेले नागरिकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीबरोबर, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचा सीएसआर निधीतून अन्नधान्याचा खर्च भागविण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुढाकार घेत योजनेसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बॅंकचे अध्यक्ष रमेशअप्पा थोरात व सर्व संचालक मंडळाचे शिवतरे यांचे आभार मानले आहेत.
 
मुख्यमंत्री सहायता निधीस ३७ लाख
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपायोजना करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन दिवसांच्या पगाराची ३७ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. तसेच शरद भोजन योजनेसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी कळविले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...