Farmers Agricultural News Marathi doing agitation for all cotton procure from farmers Pune Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी न केल्यास आंदोलन करु ः शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

पुणे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शासनाने सर्व प्रतीचा संपूर्ण कापूस खरेदी न केल्यास शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
 

पुणे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शासनाने सर्व प्रतीचा संपूर्ण कापूस खरेदी न केल्यास शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
 

लॉकडाउनमुळे २० मार्चपासून बंद असलेली कापूस खरेदी शासनाने पुन्हा सुरु केली आहे. मात्र फक्त एफएक्यू प्रतीचाच कापूस खरेदी करावा व रोज एका केंद्रावर वीस गाड्या कापूस स्विकारण्याचे आदेश सीसीआयला दिले असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांंकडे शिल्लक असलेला बहुतेक कापूस एफएक्यू प्रतीत न बसणारा आहे. हा नॉन एफएक्यू कापूस कुठे विकायचा हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. कापूसगाठी विकणे शक्य नाही, खरेदीसाठी पैसे नाही, सीसीआय व शासनादरम्यान झालेल्या जिनिंगच्या करारात वाद निर्माण झाल्यामुळे व्यापारी किंवा जिनींग मालक कापूस खरेदी करण्यास तयार नाहीत.सध्या तीव्र उष्णतेमुळे घरात कापूस ठेवणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे. परंतू खरेदी अद्याप सुरु नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शासनाने फक्त एफएक्यू कापूस खरेदी न करता आणखी दोन ग्रेडमध्ये कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी होऊ शकतो. रोज वीस गाड्यांऐवजी गर्दी न करता जितक्या जास्त गाड्या स्विकारता येतील तितक्या स्विकाराव्यात. सर्व जिनिंग प्रेसिंगवर कापूस खरेदी करण्यात यावी. गरज भासल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन शासनाने जिनिंग ताब्यात घेऊन सर्व कापसाचे जिनिंग करुन गाठी बनवाव्यात. तसेच शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यास कापूस विकल्यास त्याला भावांतर योजने अंतर्गत किमतीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, असे पर्याय शेतकरी संघटनेने सुचविले आहेत. शेतकऱ्यांची अडचण व आगामी पावसाळ्याचा विचार करता शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

राज्य शासनाने त्वरित निर्णय जाहीर करुन बुधवारपर्यंत (ता.२९) अंमलबजावणी सुरु न केल्यास शेतकरी संघटनेला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. लॉकडाउनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. घनवट यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...