Farmers Agricultural News Marathi eighty five percent water available in dams pune maharashtra | Agrowon

भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाल्याने उजनीसह सर्वच धरणे ओसंडून वाहिली. मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा चांगला पाणीसाठा आहे. मंगळवारी (ता. २१) उजनीसह सर्व धरणांमध्ये मिळून १८५.३५ टीएमसी (८५.४८ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पात २२.८१ टीएमसी (७८ टक्के) पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

पुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाल्याने उजनीसह सर्वच धरणे ओसंडून वाहिली. मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा चांगला पाणीसाठा आहे. मंगळवारी (ता. २१) उजनीसह सर्व धरणांमध्ये मिळून १८५.३५ टीएमसी (८५.४८ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पात २२.८१ टीएमसी (७८ टक्के) पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. २०१८ मधील तीव्र दुष्काळामुळे धरणांतील पाणीसाठा खूपच खालावला होता. उजनीसह अनेक धरणे अचल पातळीत गेली होती. मात्र यंदाच्या हंगामात पावसाने दमदार हजेरीने यंदा सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. जानेवारी महिन्यात शेतीसाठी आवर्तने सोडण्यास सुरुवात झाली आहे.

खडकवासला प्रकल्पात यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून १६.०५ टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा होता. उजनी धरणातही यंदा चांगला पाणीसाठा असून, चल पाणीपातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या चलपातळीत ५३.१६ टीएमसी (९९.२३ टक्के) आणि अचल पातळीत ६३.६५ टीएमसी असा एकूण ११६.८१ टीएमसी (९९.६५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. 

मंगळवारी (ता. २१) जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टीएमसी) कंसात टक्केवारी : टेमघर ०.३२ (९), वरसगाव ११.१० (८७), पानशेत ९.५४ (९०), खडकवासला १.८६ (९४), पवना ६.८२ (८०), कासारसाई ०.४५ (९८), मुळशी ११.४८ (६२), कळमोडी १.५० (१००), चासकमान ६.८४ (९०), भामा आसखेड ७.३२ (९५), आंद्रा २.७९ (९६), वडीवळे ०.७० (६५), गुंजवणी ३.३४ (९१), भाटघर २१.६७ (९२), नीरा देवघर ११.५५ (९९), वीर ५.१८ (५५), नाझरे ०.५५ (९४), पिंपळगाव जोगे ३.०५ (७८), माणिकडोह ६.९८ (६७), येडगाव १.५६ (८०), वडज १.१० (९४), डिंभे ११.२६ (९०), घोड ४.३९ (९०), विसापूर ०.८४ (९२).


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...