Farmers Agricultural News Marathi essential food distributed in tribal area Nashik Maharashtra | Agrowon

त्र्यंबकेश्वरमधील आदिवासींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

नाशिक  : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्यापाड्यांमधून अनेक आदिवासी बांधव शहरात व परिसरात रोजगारासाठी जातात. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे त्यांचा रोजगार अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर नाशिक शहरातील सामाजिक संस्थांनी आदिवासी पाड्यांवरील गरजू कुटूंबांना गहू, तांदूळ, चहा पावडर, साखर, डाळी, मीठ, मसाले अशा जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

नाशिक  : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्यापाड्यांमधून अनेक आदिवासी बांधव शहरात व परिसरात रोजगारासाठी जातात. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे त्यांचा रोजगार अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर नाशिक शहरातील सामाजिक संस्थांनी आदिवासी पाड्यांवरील गरजू कुटूंबांना गहू, तांदूळ, चहा पावडर, साखर, डाळी, मीठ, मसाले अशा जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

शेतमजुरी करून संसार चालवणारी अनेक आदिवासी कुटुंबे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम वाड्यापाड्यांमध्ये वास्तव्य करतात. टाळेबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना अन्नाच्या शोधात त्यांची विवंचना सुरू होती. शहरांजवळील कुटुंबांना नेहमी मदत पोहचते. परंतु वंचित असलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यात स्वस्त धान्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना, शासनाच्या पुरवठा विभागामार्फत अन्न-धान्य वगळता कुठलीही मदत पोहोचलेली नव्हती. अन्नधान्य तर मिळाले परंतु ते शिजवण्यासाठी रोज लागणारा किराणासारख्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या.

या परिसरात काम करणारे कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी ही बाब सामाजिक संस्थांपुढे मांडली.त्यानुसार तालुक्यातील दुगारवाडी, उर्मांडे, जांभूळवाडी, हर्षवाडी, कळमुस्ते, तळेगांव आदी गावांत शेकडो कुटुंबांना अन्नधान्याची गरज असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

त्यानुसार रुपल गुजराथी-वाघ यांनी तृप्ती महिला बहुउद्देशीय संस्था आणि स्त्री सृजन शक्ती बहुउद्देशीय सामाजिक विकास प्रबोधिनी यांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी पाड्यांवर मदत पोहोचवली. या उपक्रमात स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर, तृप्ती उद्योग, बी.जी.वाघ फाउंडेशन, स्वयंसेवक प्रणिता देसाई, हार्दिक देसाई, अनुजा देसाई, कल्पेश जाधव, श्री.वसईकर, अक्षय वाघमारे, संतोष पुणेकर, अभिलाष वाघ यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राबविताना सामाजिक अंतर, हात धुणे आदींचे पालन करून प्रबोधनही करण्यात आले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...