Farmers Agricultural News Marathi factories ignore to cutting flood effected sugarcane pune maharashtra | Agrowon

पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

पुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, साखर कारखान्यांच्या ऊस गाळपास अजूनही वेग आलेला नाही. यामुळे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरबाधित क्षेत्रात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या भागातील ऊस तोडण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ होत असल्याने सुमारे ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस कुजण्याच्या अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

पुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, साखर कारखान्यांच्या ऊस गाळपास अजूनही वेग आलेला नाही. यामुळे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरबाधित क्षेत्रात मोठी अडचण निर्माण झाली आहे. या भागातील ऊस तोडण्यास कारखान्यांकडून टाळाटाळ होत असल्याने सुमारे ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस कुजण्याच्या अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

ऑगस्ट, सप्टेबर ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी व महापुरामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली होती. यामध्ये प्रामुख्याने नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी १५ ते २० दिवस उसाचे पीक पाण्याखाली होते. यानंतर मॉन्सूनोत्तर पावसानेही या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत धुमाकूळ घातला होता. विशेष करून सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील ऊस पट्ट्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सुमारे ९७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

यंदा उशिरा पाऊस झाला. परिणामी, वेळेवर वाफसा झाला नाही. तसेच गाळप हंगामदेखील लांबला. त्यातच उसाची उपलब्धता अपेक्षित नसल्याने कारखान्यांनीही गाळप सुरू करण्यास फारशी उत्सुकता दाखवली नाही. आतापर्यंत पुणे आणि कोल्हापूर विभागात एकूण ७२ सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहे. त्यापैकी सुमारे ५५ ते ६० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. पण त्यांनी पूरबाधित क्षेत्रातील ऊस पहिल्यांदा तोडण्याऐवजी इतर भागातील उसाकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये आणखी भर पडत आहे. 

चालू वर्षी गाळप हंगाम सुरू होण्याच्या सुरुवातीलाच विभागीय सहसंचालकांनीही कारखान्यांना आदेश दिले होते, की प्रथम पूरबाधित क्षेत्रातील ऊस तोडावा, जेणेकरून नुकसानीतून वाचलेल्या उसातून शेतकऱ्यांना काही पैसे मिळतील. मात्र, त्याकडे साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुराच्या तडाख्यातून जो काही ऊस वाचला राहिला आहे, तो वाळून जाणार आहे. परिणामी, शंभर टक्के नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

प्रतिक्रिया

काही प्रमाणात साखर कारखाने सुरू झाले आहेत. साखर उताऱ्यात घट होऊ नये, म्हणून ६० टक्के चांगला तर ४० टक्के पूरबाधित उसाचे गाळप कारखान्यांकडून केले जात आहे. येत्या वीस ते पंचवीस दिवसांत हा ऊस संपण्याची शक्यता आहे. 
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

पुराने बुडालेल्या उसाची अवस्था सध्या दयनीय आहे. हा ऊस कारखान्यांकडे लवकर जाण्याची गरज आहे. पण या उसाची लवकर तोडणी होण्यासाठी कारखान्यांकडे खूप पाठपुरावा करावा लागत आहे. 
- अजित पाटील, ऊस उत्पादक, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर

सध्या पूरबधित उसाची तोडणी एकदम संथ गतीने सुरू आहे. साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस किती तोडला, याची माहिती घेतली जात आहे. लवकरच त्याबाबत भूमिका घेऊ आणि शेतकऱ्यांचा पूरबाधित ऊस न्यायला कारखान्यांना भाग पाडू. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर मिळवून देऊ. कारखान्यांना एफआरपी द्यावीच लागेल. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...