farmers agricultural news marathi farmers agitation for crop insurance akola maharashtra | Agrowon

अकोट तालुक्यातील शेतकरी पीकविम्यासाठी संतप्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अकोला : पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून भरपाई मिळत नसल्याने अकोट तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (ता. २) या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रश्‍न तत्काळ निकाली काढावा अशी मागणी केली. संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या उपस्थितीत आपली व्यथा मांडली. काही केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला. 

अकोला : पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून भरपाई मिळत नसल्याने अकोट तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (ता. २) या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रश्‍न तत्काळ निकाली काढावा अशी मागणी केली. संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या उपस्थितीत आपली व्यथा मांडली. काही केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला. 

‘संत्रा, केळी पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्या’ 
अकोट तालुक्‍यातील अकोलखेड, उमरा, पणज मंडळातील फळपिक उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, ३० ऑक्टोबरला झालेल्या गारपिटीमुळे संत्रा व केळी पिकाचे नुकसान झाले असून सर्व्हे करावा, अकोलखेड मंडळाला केळी विम्याची बाकी राहलेली रक्कम मिळावी, या मागण्यांसाठी शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या ठिकाणी आमदार नितीन देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडत तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी केली. शासनाने जाहीर केलेली हेक्टरी १८ हजारांची मदत द्यावी. उमरा व पणज मंडळात केळी पीकविम्यापोटी हेक्टरी ६६ हजार रुपये देण्यात आले. मात्र अकोलखेड मंडळाला दुजाभाव करीत केवळ ३३ हजार रुपये देण्यात आले याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.   

विमा कंपनीच्या कार्यालयावर धडकले शेतकरी  
गेल्या हंगामात केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी विम्याचा लाभ दिला जावा यासाठी अकोट तालुक्यातील शेतकरी विमा कंपनीकडे पाठपुरावा करून थकले. मात्र, कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी (ता.२) अकोट तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या येथील कार्यालयात आंदोलन केले.

अकोट तालुक्यातील शेतकरी फळ पीकविम्याच्या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर लाभ मिळाला. परंतु अद्यापही शेकडो शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांनीही विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरु केला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले तेव्हा त्यांना सोमवारी विमा कंपनीचा अधिकारी उपस्थित राहून दावे निकाली काढेल असे सांगण्यात आले. त्यानुसार हे शेतकरी सोमवारी (ता.२) उपस्थित राहिले असता कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नव्हता, अशी माहिती केळी उत्पादक शेतकरी अनिल रोकडे यांनी दिली.  


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...