नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
अकोट तालुक्यातील शेतकरी पीकविम्यासाठी संतप्त
अकोला : पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून भरपाई मिळत नसल्याने अकोट तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (ता. २) या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रश्न तत्काळ निकाली काढावा अशी मागणी केली. संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या उपस्थितीत आपली व्यथा मांडली. काही केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला.
अकोला : पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून भरपाई मिळत नसल्याने अकोट तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (ता. २) या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रश्न तत्काळ निकाली काढावा अशी मागणी केली. संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या उपस्थितीत आपली व्यथा मांडली. काही केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला.
‘संत्रा, केळी पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्या’
अकोट तालुक्यातील अकोलखेड, उमरा, पणज मंडळातील फळपिक उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, ३० ऑक्टोबरला झालेल्या गारपिटीमुळे संत्रा व केळी पिकाचे नुकसान झाले असून सर्व्हे करावा, अकोलखेड मंडळाला केळी विम्याची बाकी राहलेली रक्कम मिळावी, या मागण्यांसाठी शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या ठिकाणी आमदार नितीन देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडत तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी केली. शासनाने जाहीर केलेली हेक्टरी १८ हजारांची मदत द्यावी. उमरा व पणज मंडळात केळी पीकविम्यापोटी हेक्टरी ६६ हजार रुपये देण्यात आले. मात्र अकोलखेड मंडळाला दुजाभाव करीत केवळ ३३ हजार रुपये देण्यात आले याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
विमा कंपनीच्या कार्यालयावर धडकले शेतकरी
गेल्या हंगामात केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी विम्याचा लाभ दिला जावा यासाठी अकोट तालुक्यातील शेतकरी विमा कंपनीकडे पाठपुरावा करून थकले. मात्र, कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी (ता.२) अकोट तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या येथील कार्यालयात आंदोलन केले.
अकोट तालुक्यातील शेतकरी फळ पीकविम्याच्या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर लाभ मिळाला. परंतु अद्यापही शेकडो शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांनीही विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरु केला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले तेव्हा त्यांना सोमवारी विमा कंपनीचा अधिकारी उपस्थित राहून दावे निकाली काढेल असे सांगण्यात आले. त्यानुसार हे शेतकरी सोमवारी (ता.२) उपस्थित राहिले असता कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नव्हता, अशी माहिती केळी उत्पादक शेतकरी अनिल रोकडे यांनी दिली.