Farmers Agricultural News Marathi farmers become alert due to fear of onion theft satara maharashtra | Page 2 ||| Agrowon

जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट : शेतकरी सतर्क

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या कांद्याला सोन्याचा भाव आल्यामुळे विडणी (ता. फलटण) येथे चोरट्यांनी कांद्याच्या १८ थैल्या लंपास करून लाखोंची लूट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी रोखण्यासाठी दिवस ‘होशीय्यार... जागते रहो... कांदेचोर येतील हो’ अशा आरोळ्या ठोकण्याची वेळ आली आहे. 

फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या कांद्याला सोन्याचा भाव आल्यामुळे विडणी (ता. फलटण) येथे चोरट्यांनी कांद्याच्या १८ थैल्या लंपास करून लाखोंची लूट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी रोखण्यासाठी दिवस ‘होशीय्यार... जागते रहो... कांदेचोर येतील हो’ अशा आरोळ्या ठोकण्याची वेळ आली आहे. 

विडणी हे गाव कांद्याचे आगार मानले जाते. येथील बहुतांश शेतकरीवर्ग अल्पभूधारक असला, तरी रात्रंदिवस शेतात राबून कष्ट करून शेतातून उत्पन्न काढत असतो. विडणी येथून कांद्याच्या हंगामात हजारो क्विंटल कांद्याची उलाढाल होत असते. शेतात कायमस्वरूपी लाखो रुपये खर्च करून जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात हमी भावाअभावी कधी कधी अगदी भांडवलसुद्धा मिळत नाही. तरी पण शेतकरी काळ्या आईवर भरोसा ठेवत खचून न जाता इकडून तिकडून पैशाची जमवाजमव करून नव्या जोमाने नवी पिके घेण्याच्या तयारीला लागत असतो.

आर्थिक डबघाईमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला आता कांद्याच्या पिकाने बरे दिवस येऊ लागले आहेत. हातात पैसा खळखळू लागला आहे. अल्पभूधारक शेतकरी पुरेसे भांडवल नसल्यामुळे शेतातच किंवा आपल्या घराजवळ एखाद्या झाडाच्या सावलीला शेतातून काढलेला कांदा थैल्या भरून ठेवत असतो. त्यालापण वातावरण बदलले की प्लॅस्टिक कागदाने झाकायचे, कधी उघडून ठेवायचे, त्यातूनच गरमाईने काही नासला, तर परत सगळा खाली ओतून निवडून परत भरायचा, असे सुरू असते. कांदा लागण केल्यापासून तो काढून गोळा करेपर्यंत मजुरांसह शेतकऱ्याचे लाखो रुपये भांडवल अडकलेले असते. 

कांद्याला भाव काय मिळेल याची शाश्वती मात्र त्याला नसते. आता कांद्याला बरा दर आल्यामुळे चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्यावर डोळा ठेवला असून, विडणीतून रघुनाथ बुवा नाळे यांच्या पाच, सुरेश विठ्ठल नाळे यांच्या दोन, अनिल जगन्नाथ अब्दागिरे यांच्या सहा, तर लक्ष्मण जाधव यांच्या पाच थैल्या अशा एकूण १८ थैल्यांवर चोरट्यांनी डल्ला मारुन लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या कांदा चोरीमुळे विडणी गावातील शेतकरी खडबडून जागे झाले असून, कांद्याच्या ठिकाणी झोपून राखण करावी करत आहेत. मात्र, कांदा चोरट्यांनी राखण करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला केला, तर त्याच्या जिवावर बेतू शकते. 

पोलिसांनी गस्त पथक सुरू करावे 
कांदाचोरीच्या पार्श्‍वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी आता गावोगावी गस्त पथक सुरू करावीत, यातून कांदाचोरीसह इतर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण येईल, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात सव्वासात लाख टन उसाचे गाळपजळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार या...
मुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज...पुणे  ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या...
पुणे विभागासाठी १९९० कोटींच्या...पुणे  ः  पुणे विभागाच्या २०२०-२१ च्या...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
साताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण...सातारा  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत...
परमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर...नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग...
जळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...