Farmers Agricultural News Marathi farmers choose option to raisin production Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरातील शेतकरी निवडताहेत बेदाण्याचा पर्याय

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

माझी दोन एकर द्राक्षे आहेत. यंदा पहिल्यांदाच द्राक्षे केली आहेत. पण विक्रीची अडचण झाली आहे. खरेदीदार मिळत नसल्याने सध्या बेदाणा निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. पण त्यासाठीही रॅक मिळत नाही. सरकारने याचा विचार करुन मदत केली पाहिजे.
- लंकेश पाटील, द्राक्ष उत्पादक, पडसाळी, जि. सोलापूर.

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या तो अडचणीत आला आहे. खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने द्राक्षांना उठाव मिळत नाही. आजही २५ टक्के द्राक्ष शिवारात आहेत. परिणामी, आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेले द्राक्ष उत्पादक आता या नव्या समस्येमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पण अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बेदाणा निर्मितीचा पर्याय निवडला आहे.
 

जिल्ह्यात जवळपास २५ हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते. त्यापैकी ३० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष बेदाण्यासाठी जातात. २० टक्के द्राक्षे निर्यात आणि उर्वरित द्राक्षे देशातंर्गत बाजारात जातात. पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. अगदी पंधरवड्यापूर्वी वातावरण खूप चांगले होते. बाजारपेठेत द्राक्षाला चांगला उठाव मिळत होता. गेल्या महिन्यात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपयांप्रमाणे विक्री होणाऱ्या द्राक्षांचे दर या आठवड्यात मात्र जवळपास निम्म्याने उतरले.

आज कोरोनाचा धोका वाढत असल्याने शेतापर्यंत येणाऱ्या खरेदीदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. शिवाय स्वतः शेतकऱ्यांनाही वाहन करुन बाजारात द्राक्षे पाठवणे शक्य नाही. कारण, पुणे, मुंबई या खात्रीशीर बाजारपेठाही विस्कळीत झाल्या आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे काही भागांत द्राक्षांचे नुकसान झाल्यानेही फटका बसला. आता पुन्हा ‘कोरोना’चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांची अधिकच कोंडी होऊन बसली आहे. यावर मार्ग म्हणून शेतकरी आता ही द्राक्षे बेदाण्यासाठी नेत आहेत. सद्यःस्थितीत बेदाणा निर्मिती हाच एकमेव उपाय त्यांच्यासमोर आहे.

बेदाण्यासाठी रॅक मिळेना
द्राक्षासाठी खरेदीदार मिळत नसल्याने शेतकरी बेदाण्याकडे वळत असले, तरी तिथेही अडचण होऊन बसली आहे. एकाचवेळी शेतकरी बेदाण्याकडे वळत असल्याने बेदाणा निर्मितीसाठी असलेले रॅक उपलब्ध होत नाहीत. एकीकडे बागेत झाडांवर द्राक्षे ठेवता येत नाहीत आणि दुसरीकडे बेदाण्यासाठी द्राक्ष न्यावी, तर रॅक उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...