Farmers Agricultural News Marathi Farmers deprived of insurance coverage Nagar Maharashtra | Agrowon

नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे  नुकसान झाले. परंतु, पीकविम्यातून वगळल्याने २४ महसूल मंडळातील सुमारे ३५ हजार शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे  नुकसान झाले. परंतु, पीकविम्यातून वगळल्याने २४ महसूल मंडळातील सुमारे ३५ हजार शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यात शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.  

जिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षांत कापसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होत आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यासह कापसाचे क्षेत्र अधिक असते. परंतु, आता जिल्हाभरात कापसाची लागवड वाढत आहे. गेल्या वर्षी सव्वा लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे आधीच कापसाची वाढ कमी झाली. उत्पादनही घटले. त्यातच कापूस वेचणीला आल्याच्या काळात सलग महिनाभर परतीच्या जोरदार पावसाने तोही वाया गेला. 

गेल्यावर्षी कापसाचे जिल्हाभरात सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळासह अन्य कारणांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. गेल्यावर्षी ८५ महसूल मंडळातील ७० हजार १६८ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरवला होता. मात्र त्यातील ६१ महसूल मंडळातील ३५ हजार शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला तर २४ महसूल मंडळांना वगळले. त्यामुळे तेथील ३५ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. एकट्या पाथर्डी तालुक्यात १९ हजार, शेवगाव तालुक्यात ९ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे पीक विम्यापासून शेतकरी वंचित असताना लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत. 

विम्यातून वगळलेली महसूल मंडळे 
अरणगाव, जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव (जामखेड), भांबोरा, मिरजगाव (कर्जत), करंजी, कोरडगाव, माणिकदौंडी, पाथर्डी, टाकळी मानूर, आश्‍वी, पिंपळनेर, साकूर, शिबलापूर (संगमनेर), बोधेगाव, चापडगाव, (शेवगाव) बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, काष्टी, मांडवगण, पेंडगाव, श्रीगोंदा. 
 
कापूस पीक विम्याची स्थिती 

  • सहभागी शेतकरी ः ७० हजार १६८
  • क्षेत्र ः ३९ हजार हेक्टर 
  • भरलेला विमा हप्ता ः २७ कोटी २० लाख २९ हजार 
  • मिळालेली भरपाई ः ३० कोटी २८ लाख २४ हजार 
  • लाभार्थी शेतकरी ः ३५ हजार ८३७  

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...