Farmers Agricultural News Marathi farmers facing trouble to reach farms due to lock down Kolhapur Maharashtra | Agrowon

कर्नाटक सीमेवरील शेतकऱ्यांची शेतीची वाट बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

संकेश्‍वरच्या शेतकऱ्यांची शेती नांगनूर हद्दीत आहे. शेतीच्या कामांना बंदी नसली तरी बेळगाव जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने कर्नाटकातून कोणालाही प्रवेश देवू नये अशा सूचना आहेत. संकेश्‍वरचे संबंधित शेतकरी याप्रश्‍नी स्थानिकांशी रोज वाद घालत आहेत. यामध्ये प्रशासनानेच मार्ग काढणे गरजेचे आहे.
- विकास मोकाशी, उपसरपंच ,नांगनूर.

गडहिंग्लज, जि.कोल्हापूर  : कर्नाटकच्या संकेश्‍वरमधील पंधराहून अधिक शेतकऱ्यांची शेती महाराष्ट्रातील नांगनूरसह (ता. गडहिंग्लज) इतर गावांच्या हद्दीत आहे. परंतु, बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये येत असल्याने कर्नाटकातील नागरिकांना महाराष्ट्रात येण्यास बंदी आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. संकेश्‍वरच्या शेतकऱ्यांना नांगनूरमध्ये येण्यास प्रतिबंध केला आहे. परिणामी, त्यांच्या शेताची वाट बंद झाली आहे.

नांगनूरपासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या संकेश्‍वरात कोरोना बाधित रूग्ण आढळला आहे. महाराष्ट्रातील प्रशासनाने तातडीने आंतरराज्य सीमाबंदी करून कर्नाटकच्या कोणालाही महाराष्ट्रातील प्रवेशाला प्रतिबंध केला आहे. नांगनूरच्या हद्दीत संकेश्‍वरमधील शेतकऱ्यांची शेती आहे. तसेच अरळगुंडी भागातही काहींची शेती आहे. नेसरी भागातील महाराष्ट्रातील हेब्बाळ जलद्याळ आणि कर्नाटकातील दड्डी गावची परिस्थितीही अशीच आहे. या दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एकमेकांच्या हद्दीत आहेत. परंतु, या ठिकाणी शेतीकामे सुरळीत सुरू आहेत. या दोन्ही गावांच्यामध्ये चेकपोस्ट असला तरी शेतातूनच ये-जा सुरू असल्याने तेथे कोणतीच अडचण नसल्याचे सांगण्यात आले. परंतु संकेश्‍वर व नांगनूरची परिस्थिती वेगळी आहे.

नांगनूर व संकेश्‍वर या दोन गावांच्या मध्ये हिरण्यकेशी नदी आहे. यामुळे संकेश्‍वरच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र हद्दीतील चेकपोस्ट ओलांडूनच शेतात जावे लागते. परिणामी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार या नाक्‍यातून शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. रोज संबंधित शेतकरी आणि नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांशी वाद सुरू आहे. .

 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...