नांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर शेतकऱ्यांची तूरीठी नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने (५८०० रुपये क्विंटल) तूर विक्रीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवर ४ हजार ५७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित न केल्यामुळे यंदाच्या हंगामात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी बुधवारपासून (ता. १) ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

नाफेडतर्फे हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी महासंघ, महाएफपीसी यांना शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे हदगाव, किनवट, मुखेड येथे नोंदणी सुररू करण्यात आली असून, या तीन केंद्रांवर आजवर २२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे जिल्हा विपणन अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.

विदर्भ सहकारी महासंघातर्फे भोकर, धर्माबाद, नायगाव येथे नोंदणी सुररू आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, पालम, पूर्णा येथील केंद्रांवर १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार येथील खरेदी केंद्रांवर १ हजार ९६० शेतकऱ्यांची नोंदणी केली असे जिल्हा विपणन अधिकारी मिलिंद कापुरे यांनी सांगितले. 

परभणी जिल्ह्यात विदर्भ सहकारी महासंघातर्फे मानवत येथील केंद्रावर १ हजार ६० शेतकऱ्यांचे अर्ज आले असून, त्यापैकी २६० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. गंगाखेड येथील केंद्रावर १ हजार ३५० शेतकऱ्यांचे अर्ज आले असून, त्यापैकी २५१ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित केल्यानंतर खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com