Farmers Agricultural News Marathi Fertilizer supply will continue in district Aurangabad Maharashtra | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत राहणार ः जिल्हाधिकारी उदय चौधरी

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीतही खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीतही खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. ११) खत पुरवठा  व वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी संबंधितांना सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह खत कंपन्यांचे प्रतिनिधी, माथाडी कामगार तसेच ट्रक वाहतूक युनियनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, की जिल्ह्यात युरियासह इतर खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहणार आहे. लॉकडाउन कालावधीत खतांच्या पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारे बंधने येणार नसून सर्व शेतकऱ्यांना गरजेनुसार युरिया तसेच इतर खते मिळणार आहे. त्यादृष्टीने माथाडी कामगार, खत कंपनी प्रतिनिधी, ट्रक चालकांनी खत वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे. ट्रक चालक, माथाडी कामगार, खत कंपन्यांचे कर्मचारी, वाहतूक व हाताळणी संस्थेचे कर्मचारी यांना पास देण्याच्या सूचनाही श्री.चौधरी यांनी बैठकीत दिल्या. पोलीस विभागाकडून खते वितरणामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. लॉकडाऊन कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यासाठी नियोजनाप्रमाणे कंपन्यांनी खत पुरवठा करावा. लॉकडाउन आहे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची रेल्वे रेक अन्य जिल्ह्यांकडे वळवू नये.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...