Farmers Agricultural News Marathi fertilizers demand for Kharip season Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्‍ह्यात खरिपासाठी एक लाख ८० हजार टन खतांची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

पुणे   ः पुणे जिल्हयात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे एक लाख ८० हजार टन खतांची मागणी नोंदविली आहे. तसेच गेल्या वर्षीचे ११ हजार ४७४ टन खते शिल्लक असून, मागणी केलेल्या खतांचा पुरवठा मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे   ः पुणे जिल्हयात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे एक लाख ८० हजार टन खतांची मागणी नोंदविली आहे. तसेच गेल्या वर्षीचे ११ हजार ४७४ टन खते शिल्लक असून, मागणी केलेल्या खतांचा पुरवठा मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८८ हजार २३७ हेक्टर आहे. त्यापैकी दोन लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भात व सोयाबीनच्या क्षेत्राच्या वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडून होणारी खतांची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने पुरवठयाचे नियोजन केले आहे. लवकरच कृषी आयुक्तलयाकडून खतासाठ्याला मंजुरी मिळणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना या खतांचा पुरवठा होणार आहे.

यंदा खरीपासाठी सुमारे एक लाख ९१ हजार ४७४ मेट्रीक टन खते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. संयुक्त खतांची ७१ हजार टन, सरळ खतांची एक लाख ९ हजार टन मागणी केली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे एक लाख ९० हजार टन खताची मागणी नोंदविली होती. त्यापैकी कृषी विभागाने एक लाख ८५ हजार १५८ टन खतांचा पुरवठा मंजूर केला होता. मात्र, यंदा मागणी कमी केली असली तरी शिल्लक खतांचा साठा अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होणार आहेत.

गेल्या वर्षीची ११,४७४ टन खते शिल्लक
गेल्या वर्षी पुणे जिल्हयात खरिपात एक लाख ३२ हजार ८०३ टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यापाठोपाठ रब्बीतही खतांचा पुरवठा व्यवस्थित असल्याने १ एप्रिल रोजी ११ हजार ४७४ टन खते शिल्लक असल्याचे समोर आले. यामध्ये ९ हजार ८२७ टन संयुक्त खतांचा, एक हजार ६४७ टन सरळ खतांचा समावेश आहे.
--------------------------------
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...