Farmers Agricultural News Marathi fifty eight candidates fight election of market committee Mumbai Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समिती निवडणूकीसाठी ५८ उमेदवार रिंगणात

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

बाजारसमितीतील एकूण १८ जागांसाठी १८१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. येत्या २९ तारखेला मतदान पार पडणार आहे.
- श्‍यामकांत साळुंखे, सहायक निवडणूक अधिकारी

मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शुक्रवारी (ता. १४) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १२३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे आता निवडणूक लागलेल्या विभागांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

बाजार समितीच्याअंतर्गत येणारे सहा महसूल विभाग, पाच बाजार आवार आणि व्यापारी, हमाल, माथाडी यांच्या प्रतिनिधींची ही निवडणूक होत आहे. यातील व्यापारी, हमाल, माथाडी या विभागातून आणि फळ बाजारातून प्रत्येकी एकेका उमेदवाराने अर्ज दाखल केला असल्याने या दोन गटांमधील निवडणूक बिनविरोध झाली आहे; मात्र सहा महसुली आणि चार बाजार आवारांत अटीतटीची लढत होणार असल्याची स्थिती आहे.  

कांदा-बटाटा बाजारात या वेळी अशोक वाळुंज, सुरेश शिंदे आणि राजेंद्र शेळके यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मसाला बाजारात विजय धुत, अशोक राणावत आणि कीर्ती राणा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अन्न-धान्य बाजारात नीलेश वीरा, पोपटलाल भंडारी आणि लक्ष्मीदास भानुशाली यांच्यातही तिरंगी लढत आहे. भाजीपाला बाजारात शंकर पिंगळे, के. डी. मोरे, प्रताप चव्हाण आणि अप्पासाहेब शिरकर यांच्यात लढत होईल. इतर सहा महसुली विभागांपैकी अमरावती विभागातून सात, नागपूर विभागातून सात, नाशिक विभागातून आठ, कोकण विभागातून पाच, औरंगाबाद विभागातून अकरा आणि पुणे महसुली विभागातून पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...