नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया उपलब्ध

आमचे ३५ एकर क्षेत्र आहे. त्यानुसार साधारण ३५ ते ४० गोण्या खतांची गरज आहे. मात्र पाच गोण्याही मिळत नाहीत. त्याशिवाय युरियासोबत इतर खते घेण्याबाबत आग्रह केला जातो. खताची मोठी टंचाई असून परिस्थिती अवघड आहे. - विष्णुपंत गलांडे, शेतकरी, निंभे, ता. कर्जत, जि. नगर.
खत पुरवठा झाल्याचे कळताच खरेदीसाठी शेतकऱ्यांची अशी गर्दी दुकानांसमोर होत आहे.
खत पुरवठा झाल्याचे कळताच खरेदीसाठी शेतकऱ्यांची अशी गर्दी दुकानांसमोर होत आहे.

 नगर   ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची शेतकरी मागणी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागणीच्या ५० टक्केच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विक्रेते उपलब्ध असलेल्या खताचीही टंचाई निर्माण करत चढ्या दराने विक्री करीत आहेत. काही ठिकाणी लिंकिंगही केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभाग मात्र खत टंचाईकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात खरीप पिके जोमात असून आता या पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून या खताची टंचाई निर्माण केली जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा १ लाख २२ हजार ८३८ टन युरियाची मागणी केली होती. आतापर्यंत ५४ हजार ६४० मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यात ३४ हजार मेट्रिक टन खत हे गतवर्षीचे आहे. म्हणजे यंदा आतापर्यंत केवळ २० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात युरिया गोणीची जास्त दराने विक्री केली जात आहेच, पण युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ग्रामीण भागात खते आल्याचे कळताच शेतकऱ्यांची दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मागणीच्या तुलनेत केवळ दहा टक्केच खते दिली जात आहे, असे शेतकरी सांगतात. कृषी विभाग मात्र अलबेल असून विक्रेत्यांना पाठिशी घालत खताची टंचाई नसल्याचा नेहमीप्रमाणे दावा करतेय. युरिया जादा दराने खरेदी करावा लागत असल्याने शेतकरी मात्र हतबल झालेत.  

 जिल्ह्यातील खतांची स्थिती (टन)
खत. मागणी उपलब्धता
युरिया १,२२,८३८ ५४,६४०
एमओपी १८,७०७ ९३७५
एसएसपी २७,०४५ २३,२०९
डीएपी ३१,४४४ २५,४९०
संयुक्त खते ९१,२९८ ८७,१८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com