Farmers Agricultural News Marathi Fifty percent urea available in district Nagar Maharashtra | Agrowon

नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया उपलब्ध

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जुलै 2020

आमचे ३५ एकर क्षेत्र आहे. त्यानुसार साधारण ३५ ते ४० गोण्या खतांची गरज आहे. मात्र पाच गोण्याही मिळत नाहीत. त्याशिवाय युरियासोबत इतर खते घेण्याबाबत आग्रह केला जातो. खताची मोठी टंचाई असून परिस्थिती अवघड आहे.
- विष्णुपंत गलांडे, शेतकरी, निंभे, ता. कर्जत, जि. नगर.

 नगर   ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची शेतकरी मागणी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागणीच्या ५० टक्केच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विक्रेते उपलब्ध असलेल्या खताचीही टंचाई निर्माण करत चढ्या दराने विक्री करीत आहेत. काही ठिकाणी लिंकिंगही केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभाग मात्र खत टंचाईकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात खरीप पिके जोमात असून आता या पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून विक्रेत्यांकडून या खताची टंचाई निर्माण केली जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा १ लाख २२ हजार ८३८ टन युरियाची मागणी केली होती. आतापर्यंत ५४ हजार ६४० मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यात ३४ हजार मेट्रिक टन खत हे गतवर्षीचे आहे. म्हणजे यंदा आतापर्यंत केवळ २० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात युरिया गोणीची जास्त दराने विक्री केली जात आहेच, पण युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ग्रामीण भागात खते आल्याचे कळताच शेतकऱ्यांची दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मागणीच्या तुलनेत केवळ दहा टक्केच खते दिली जात आहे, असे शेतकरी सांगतात. कृषी विभाग मात्र अलबेल असून विक्रेत्यांना पाठिशी घालत खताची टंचाई नसल्याचा नेहमीप्रमाणे दावा करतेय. युरिया जादा दराने खरेदी करावा लागत असल्याने शेतकरी मात्र हतबल झालेत.

 

 जिल्ह्यातील खतांची स्थिती (टन)
खत. मागणी उपलब्धता
युरिया १,२२,८३८ ५४,६४०
एमओपी १८,७०७ ९३७५
एसएसपी २७,०४५ २३,२०९
डीएपी ३१,४४४ २५,४९०
संयुक्त खते ९१,२९८ ८७,१८८

 


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...