नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत मातीमोल

आम्ही पाॅलिहाऊस उभारुन फुलांचे उत्पादन घेतो. आमच्या गावातील फुलांना परराज्यात मागणीही चांगली आहे. मात्र बंदमुळे ऐन हंगामात फुलांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून आम्ही हतबल आहोत. शिवाय अवकाळी पावसाचेही संकट उभे राहिले आहे. - सागर शेळके, फुलोत्पादक शेतकरी, अकोळनेर, जि. नगर.
वाहतुक बंद असल्याने फुले तोडणी करुन फेकून दिली जात आहेत.
वाहतुक बंद असल्याने फुले तोडणी करुन फेकून दिली जात आहेत.

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील वाहतुक बंद असल्याने त्याचा मोठा फटका फुलोत्पादकांना बसला आहे. ऐन हंगामात विक्री करता येत नसल्याने लाख मोलाची फुले फेकून द्यावी लागत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात फुलोत्पादकांना दर दिवसाला सुमारे ५० ते ७५ लाखांचा फटका बसत असून आतापर्यंत सुमारे पाच ते सहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

नगर जिल्ह्यामधील नगर, पारनेर, राहाता, संगमनेर तालुक्यात फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिल्हाभरात सुमारे ३५० ते ४०० हेक्टर क्षेत्रावर फुलशेती आहे. यात सुमारे २५० हेक्टरवर पाॅलिहाऊस, शेडनेटच्या माध्यमातून फुलोत्पादन घेतले जाते. दर दिवसाला तोडणी करुन ही फुले हैद्राबाद, बडोदा, नागपूर भागात पाठवली जातात. ही फुले ट्रॅव्हल्स अथवा वैयक्तिक वाहनांतून नेली जातात.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून फुलांची वाहतूक पुर्णतः थांबलेली आहे. फुलांची दर दिवसाला तोडणी करावी लागते, अन्यथा दोन दिवसांत फुले खराब होतात व त्याचा परिणाम झाडांवर होतो. त्यामुळे फुलोत्पादकांना नाईलाजाने लाख मोलाची फुले तोडून बांधावर टाकावी लागत असल्याने प्रती एकर सुमारे सात ते आठ हजार रुपयांचा फटका सोसावा लागत आहे.

नगर तालुक्यातील अकोळनेर हे फुलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुनील जाधव, शहाजी भोर, सागर शेळके,अरुण भोर, सागर भोर, रावसाहेब भोर, सचिन भोर, राहुल मैत्रे, रघुनाथ शेळके, अविनाश शेळके हे शेतकरी पाॅलीहाऊसच्या माध्यमातून फुलांचे उत्पादन घेतात. मात्र सध्या वाहतूक बंद असल्याने अकोळनेर गावांत फुले फेकून दिली जात असल्याने दर दिवसाला एक ते दिड लाखांचा फटका बसत आहे.

शिर्डी, राहाता परिसरातही मोठ्या प्रमाणात फुलोत्पादन घेतले जाते, मात्र श्री साईबाबा दर्शनही बंद असल्याने येथील फुलोत्पादकही आर्थिक फटका सहन करीत आहेत. नगर जिल्ह्यात दर दिवसाला फुलोत्पादकांना ५० ते ७५ लाखांचा फटका बसत असून आतापर्यंत सुमारे पाच ते सहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत असून वादळाने पाॅलिहाऊसचे नुकसान झाले असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com