कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभ

कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभ झाला
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभ झाला

कोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९ व्या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (ता.१४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. 

या वेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर, नगरसेवक राहुल चव्हाण, उमा इंगळे, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, सीमा कदम, राज अथणे, कल्पना सावंत आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,‘‘कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर, हरित करण्यासाठी जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. लोकमाध्यमातून आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून करवीरनगरी हरित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. असे झाले तर कोल्हापूरकडे पर्यटक आणखी आकर्षित होतील.’’ या वेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले,‘‘शहरातील प्रत्येक उद्यानात असे प्रदर्शन भरवले पाहिजे तरच लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजेल.

या वेळी गार्डन्स क्लबच्या रोजेट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.१६) सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने, सजावटी यांची रेलचेल असणार आहे. या प्रदर्शनांमध्ये नर्सरी बगिच्यांचे साहित्य व खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल्स आहेत. या स्टॉलचे उद्घाटन नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आज (ता.१५) लहान मुले व जेष्ठांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयक लघुपट स्पर्धा, बोटानिक फॅशन शो आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com