Farmers Agricultural News Marathi fodder plantation status Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा लागवड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने चारा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ४८ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड झाली आहे. सर्वाधिक चाऱ्याचे क्षेत्र संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांत आहे. श्रीरामपूर क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही. 

नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने चारा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ४८ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड झाली आहे. सर्वाधिक चाऱ्याचे क्षेत्र संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांत आहे. श्रीरामपूर क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही. 

जिल्ह्यात दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दोन वर्षांत मात्र दुष्काळ, पाणीटंचाईमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दूध व्यवसायावर संकट कोसळले. गंभीर चाराटंचाईला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांनी यंदा चारा उत्पादनावर भर दिला आहे. यंदा जिल्हाभर चांगल्या पैकी पाणी उपलब्ध झाले असल्याने चाऱ्याचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या वर्षी वीस हजारांपुढे चाऱ्याचे क्षेत्र गेले नव्हते. यंदा मात्र आतापर्यंत ४८ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड झाली आहे. त्यात १८ हजार ५२१ हेक्टरवर मका, ९७०० हेक्टरवर ज्वारी कडवळ, ५८८६ हेक्टरवर लुसर्न ग्रास, १५७९ हेक्टरवर नेपीयर ग्रास तर १२ हजार ४०२ हेक्टरवर इतर चारापीकांची लागवड झाली आहे. 
 
तालुकानिहाय चारा क्षेत्र (हेक्टर) : नगर ः ४९५३, पारनेर ः ४२५५, श्रीगोंदा ः ६४६७, कर्जत ः ४०७३, जामखेड ः ६१२, शेवगाव ः २०६१, पाथर्डी ः २४८२, नेवासा ः १८११, राहुरी ः ५८८०, संगमनेर ः ८६००, अकोले ः १५८३, कोपरगाव ः२२२६, श्रीरामपूर ः ७७८, राहाता ः २३०९.


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...